श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

बारामती, 2 डिसेंबरः बारामती तालुक्यातील मौजे सायंबाची वाडी येथे 1 डिसेंबर 2022 रोजी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. यावेळी श्रमदान करण्यासाठी अस्मिता ग्राम संघाच्या महिला सर्व सदस्य, अध्यक्ष तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीत जागतिक एड्स दिनानिमित्त समानता संकल्पना

यावेळी बारामती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल व तालुक्यातील सर्व महिला कृषि सहाय्यक प्रोत्साहन पर श्रमदानासाठी उपस्थित होत्या. तालुका कृषि अधिकारी बांदल यांच्या मार्गदर्शनात आणि सर्व महिला कृषि सहाय्यक यांच्या मदतीने तृप्ती गुंड यांनी सर्व महिला व शेतकऱ्यांना एकत्र आणून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे काम पूर्ण केले.

या प्रसंगी कृषि-मैत्रीण रोहिणी इंगळे, मनोहर भापकर, बाळासाहेब झणझने, महिला वर्ग तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीत ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

2 Comments on “श्रमदानातून बांधला वनराई बंधारा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *