वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष पदी मंगलदास निकाळजे तर महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड

पुणे, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडीची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली आहे. यामध्ये वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष पदी मंगलदास निकाळजे यांची निवड झाली आहे. तसेच वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा कार्यकारणीत गणेश थोरात आणि किरण मिसळ यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.



तर वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा सचिवपदी ऍड. मंगेश लोंढे यांची, कृष्णा साळुंके यांची सहसचिव पदी, सुरज कोरडे आणि रोहित माने यांची संघटक पदी आणि सचिन कांबळे यांची प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली आहे. वंचित बहुजन युवा आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने या निवडी झाल्या आहेत. यासंदर्भातील नियुक्तीचे पत्र त्यांना वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी दिले आहे.

दरम्यान, मंगलदास निकाळजे हे समाजातील लोकांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी ओळखले जातात. तसेच ते याचा जाब विचारण्यासाठी आघाडीवर असतात. मंगलदास निकाळजे हे युवकांचे प्रश्न सातत्याने मार्गी लावत असतात. त्यांच्यात संघटन कौशल्य मजबूत असल्याने त्यांनी अतुट अशी युवकांची फळी निर्माण केलेली आहे. याशिवाय मंगलदास निकाळजे हे नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.



त्यांनी अनेक मोर्चे, आंदोलने यांमध्ये सहभाग घेऊन समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. मंगलदास निकाळजे यांनी ब्ल्यू पँथर सामाजिक संघटनेच्या संस्थापक आणि अध्यक्ष पदाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. त्यांनी केलेल्या या कामाची पावती म्हणून त्यांची आता वंचित बहुजन युवक आघाडीच्या पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, “युवक वर्ग वंचित बहुजन आघाडी पक्षाकडे कसा आकर्षिला जाईल, यासाठी काम करणार आहे. पुणे जिल्ह्यात येणाऱ्या काळात निवडणूकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवून बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करणार आहे,” असे या निवडी प्रसंगी मंगलदास निकाळजे यांनी म्हटले आहे. त्यासोबतच वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिक चव्हाण हे पत्रकारिता क्षेत्रात अग्रसर असल्याने त्यांचा युवक वर्गामध्ये चांगला संपर्क आहे. याआधी त्यांनी बारामती तालुका सचिव पदी काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *