अकोला, 31 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले होते. या पत्रकावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. पण अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट केली.
https://twitter.com/VBAforIndia/status/1752672388381323546?s=19
https://twitter.com/VBAforIndia/status/1752650019314766134?s=19
आमच्याकडून काही मुद्दे मांडण्यात आले!
महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला चर्चेसाठी येण्याचं काल निमंत्रण आलं होतं. त्यामुळे आम्ही या बैठकीला गेलो. परंतू या बैठकीत महाविकास आघाडीचं काही ठरलेलं नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. या बैठकीत ठराव म्हणून आमच्याकडून काही मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षणाचा मुद्दा, दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली. त्याबाबतची भूमिका प्रत्येक घटक पक्षाने स्पष्ट करावी. हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
https://twitter.com/VBAforIndia/status/1752672388381323546?s=19
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही!
वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये. कारण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचे असेल तर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने म्हणजे AICC ने त्याला मान्यता दिली पाहिजे. त्यांची मान्यता आहे की नाही? हेच आम्हाला माहिती नाही. नाना पटोले हेच सध्या पत्र व्यवहार करतात. आम्हाला असे सांगण्यात आले होते की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यासंदर्भातील निर्णय घेतील. मात्र त्या दौघांपैकी कोणाचीही या पत्रावर स्वाक्षरी नाही. नाना पटोले यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्या पत्रावरची त्यांची सही मी व्यक्तिगत मानतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. तसेच केंद्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणार नाही, यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही, याचा खुलासा आम्ही या बैठकीत केला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/VBAforIndia/status/1752651081627385988?s=19
2 फेब्रुवारी बैठक असल्याची माहिती
2 फेब्रुवारीला जी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये अजेंडा दिला आहे, तो आणि त्याचबरोबर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन घटक पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तयार होईल, असं मी याठिकाणी मानतो. त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही कलेक्टिवली बार्गनिंग करायचे की? आम्ही वैयक्तिक एक-एक पक्षासोबत बोलायचं? यासंदर्भातील निर्णय या बैठकीत होईल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.