बारामती शहरातील वैभव वाईन्स दुकान सील! राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बारामती, 13 मार्च: बारामती एमआयडीसी परिसरातील प्रसिद्ध अशा वैभव वाईन्स या दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वैभव वाईन्स शॉप या दुकानाला सील ठोकले आहे. या वाईन्स शॉपमध्ये बाहेरील माल आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे वाईन्स शॉप विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.



तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून वैभव वाईन्स शॉपमध्ये बाहेरचा माल असल्याची चर्चा बारामती परिसरात दबक्या आवाजात सुरू होती. यासंदर्भात काही लोकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल आता उत्पादन शुल्क विभागाने घेतली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज वैभव वाईन्स या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत त्यांना ह्या वाईन्स शॉपीमध्ये बाहेरील माल असल्याचे निदर्शनास आले.



त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावेळी वैभव वाईन्स हे दुकान सील केले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप विभागीय अधिकारी रोकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. दरम्यान, वैभव वाईन्स हे बारामती शहरातील प्रसिद्ध असे वाईनचे दुकान आहे. मात्र, हे दुकान आता सील करण्यात आल्यामुळे या बातमीची चर्चा बारामती शहरात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *