बारामती, 13 जुलैः बारामती तालुक्यातील मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळेत 10 ते 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांना आज, 13 जुलै 2022 रोजी कोरोना लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ .उबाळे व डॉ. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी गायकवाड व परिचारिका देसाई यांनी केले आहे.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांना पहिला डोस दिला होता. त्या विद्यार्थ्यांना आज दुसरा डोस दिला. तसेच नविन विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाची आरक्षण सोडत कार्यक्रमाला तुर्तास स्थगिती