बारामती, 6 सप्टेंबरः संपुर्ण पुणे जिल्ह्यात गो वर्गीय जनावरांमध्ये (म्हैस वर्गीय वगळून) लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी आदेश काढून लम्पी रोग या रोगासाठी संपुर्ण जिल्ह्यात नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. या आदेशानुसार बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील दर गुरुवारी भरण्यात येणारे गुरांचे बाजारही नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
संपुर्ण जिल्ह्यालाच लम्पी चर्म रोगासाठी नियंत्रण क्षेत्र घोषित
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गुरे बाजारात येणाऱ्या गो वंशीय प्राण्यांसंदर्भात मार्केट यार्ड समितीकडून मोठी बंधने लादण्यात आली आहेत. कोणत्याही गो जातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे व बाजारातील खरेदी-विक्री करतांना किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्म रोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला बाजार समितीस सादर करणे बंधनकारक राहील, अशी माहिती बारामती कृषि उत्पन्न बाजार मार्केट यार्डचे सचिव अरविंद जगताप यांनी भारतीय नायक शी बोलताना दिली आहे.
राज्य स्तरीय शस्त्र व शास्त्र स्पर्धेत राजे प्रतिष्ठान प्रथम
दरम्यान, उद्या 7 सप्टेंबर 2023 रोजी गुरुवार असून जळोची येथील मार्केट यार्डच्या गुरांच्या बाजारात बारामती तालुक्यातून तसेच आसपासच्या परिसरातून अनेक गो वंशीय प्रजातीची जनावरे ने- आण करण्यात येणार आहे. मात्र ही गो वंशीय प्रजातीची जनावरे मार्केट यार्डमध्ये आणताना किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्म रोगासाठी लसीकरण आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला आता बंधनकारक राहणार आहे.
One Comment on “बारामती गुरे बाजारात लसीकरण प्रमाणपत्र आणि आरोग्य दाखला बंधनकारक!”