फिरीस्ता…..
अभ्याः काय सभ्या, काय म्हणतंय राजकारण?
संभ्याः काय नाय, नगरपालिका वजन वाटोळे केलंय, ते दुरुस्त करण्यासाठी तिसरी आघाडीची तयारी करण्याचे काम चालू हाय.
अभ्याः म्हंजे, पॅनल बिनेल टाकतो की काय?
संभ्याः नाय बाबा चार-पाच वार्डात महापुरुष चे विचाराचे आदर्शाचे पाईक उभे करतोय
अभ्याः म्हंजे पुन्हा मारून घेणार की काय?
संभ्याः अरं, असलं कुचकट सोडून दे. अजून ही समाजामध्ये पाईक लोक जिवंत हायती. मग आदर्शावर जगण्यासाठी मर मिटाया तयार हायती.
अभ्याः अरं, तुम्हाला घोडा लावल्यालं ही कळत न्हाय, कसल्या आदर्शच्या गप्पा करतुया, इकाऊ साले.
संभ्याः अरं इकायची सवय लावली कोणी? इतकं घेतोय कोण? भावा-भावात माणूस ठेवला न्हाय त्यांनी, या इकाऊ वृत्तीमुळं.
अभ्याः तेच म्हणतोय, मालक घेऊन बाजारात बसल्यावर माझं घ्या, माझ्या घ्या म्हटल्यावर गिराईक तर येणारच की.
संभ्याः तुम्ही दलाली करायची, मताचा भाव तुम्हीच फोडायचा, आदर्शाचा गळा घोटण्याचा तुम्हीच आणि तुम्हीच पुन्हा महापुरुषांचे विचार सांगायचे, राजकारण करायचं तुम्हीच, मताची भाड खायची तुम्हीच, शिव्या मात्र समाजाला द्यायची!
अभ्याः अरं आमच्याकडे उपल्यांची टोळी हाय, जी फक्त नामर्द- हिजडे तयार करते.
संभ्याः उपल्या म्हंजे काय असतं रं?
अभ्याः तुला माहित न्हाय, मग ऐक. उपल्या नावाची माणसातील एक माकडाची जात हाय, ही जात मादीशी संभोग करते, (आपल्या भाषेत काय पण समजा) पण त्या मादीला पिल्लं झाले की त्यातला नर स्वाभिमानी युद्धा माधीपासून हिसकावून घेतो आणि झाडावर आपटून मारून टाकतो. आपल्या समाजात स्वाभिमानी युद्धे तयार होऊन देतच न्हाय, त्यो उपल्या समाजातला पुढारी, कितेक मादींवर बलात्कार करून बच्चे तयार करतो. पण गुलाम, शेळपट, नामर्द असे बच्चे पैदा करतो. त्यामुळे समाजात क्रांतीची बीज पेरले जातच न्हाय.
संभ्याः अरं असली उपल्यांच्या टोळ्यात लय हायती समाजात. पण भेऊ नकोय, या उपल्यांना मारायला वाघ जन्माला आलाय आणि तो अशा किती उपल्यांच्या टोळ्या खल्लास करतील, हे तुला थोड्या दिवसात कळेल.