सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) देशभरात आज संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आज संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा कार्यक्रम देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि तेथे उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय

दरम्यान, स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. तर सरन्यायधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने पुतळा उभारण्यात आला आहे. 7 फूट उंचीचा हा पुतळा असून, यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना वकिलाचा पोशाख घालण्यात आला आहे. तसेच त्यांच्या हातात संविधानाची प्रत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातील बागेत हा पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा हरियाणामधील मानेसर येथे तयार केलेला आहे. प्रसिद्ध मूर्तिकार नरेश कुमावत यांनी हे शिल्प बनवले आहे.

डोक्याचे जेवढे केस पिकलेत, तेवढी आंदोलने केलीत – छगन भुजबळ

तत्पूर्वी, आंबेडकरी चळवळीत वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र लिहिले होते. त्यानंतर डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला. 

One Comment on “सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *