दरम्यान, बारामती नगर परिषदेकडून शहरासह हद्दवाढ झालेल्या भागात मान्सून पुर्व कामे सुरु आहेत. या मान्सून पुर्व कामात नाल्यांची साफसफाई, नदी, ओढ्यांची साफ सफाई, रस्त्यांची दुरुस्तीची कामे, पद दिव्यांची कामे, धोकादायक झाडांच्या फांद्या कटईची कामे आदी कामे करण्यात येत आहे. या मान्सून पुर्व कामांसाठी बारामती नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करत आहेत. मात्र पहिल्याच मुसळधार अवकाळी पावसाने बारामती नगर परिषदेच्या कामांच्या फज्जा उडविल्याचे चित्र समोर आहे. अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे शहरातील अनेक भागातील गटरी तुंबल्याचे समोर आले आहे. गटरी तुंबल्याने ते पाणी रहदारीच्या रस्त्यावर आल्याने वाहतुक व्यवस्था मंदावली, तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाड्यांच्या फांद्या वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडल्याचे चित्र आहे.
अवकाळी पावसाने उडविला नगर परिषदेच्या कामाचा फज्जा

बारामती, 11 मेः बारामती शहरासह परिसरात सायंकाळी 5.47 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसाने अक्षरशः बारामतीकरांना झोडपले. सायंकाळची वेळ असल्याने बहुतेक ऑफिसांची सुटण्याची वेळ आहे. या अवकाळी पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच वादळी वाऱ्यामुळे शहरात ठिक ठिकाणी झाड्याची फांद्या पडल्या आहेत. अनेकांच्या घरांची पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाल्याचे चित्र आहे. अनेक भागात या मुसळधार अवकाळी पावसामुळे पाणी साठले आहे.