नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नवीन कररचना लागू करण्यात आली असून, त्याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला होण्याचा अंदाज आहे. कररचनेतील बदलांमुळे करदात्यांवरचा भार कमी होईल. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
https://x.com/ANI/status/1885583204448698788?t=HWOmxUX4yVjrfQIkvggCIA&s=19
करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ
या नवीन कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तसेच, नोकरदार करदात्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना 12 लाख 75 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. कराचा भार कमी झाल्यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसा राहील. तसेच घरगुती वापर, बचत आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत मोठे बदल
2024 मध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते, मात्र या वर्षी ही मर्यादा 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय, मध्यमवर्गीयांवरील कराचा भार कमी करण्यासाठी कराच्या टक्केवारीत बदल करण्यात आले आहेत.
नवीन कर रचना (2025):
0 ते 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – करमुक्त
4 ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 5 टक्के कर
8 ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 10 टक्के कर
12 ते 16 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 15 टक्के कर
16 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 20 टक्के कर
20 ते 24 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 25 टक्के कर
24 लाखांपेक्षा जास्त रुपये वार्षिक उत्पन्न – 30 टक्के कर
मागील वर्षीची कर रचना (2024):
0 ते 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – करमुक्त
3 ते 7 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 5 टक्के कर
7 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 10 टक्के कर
10 ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 15 टक्के कर
12 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 20 टक्के कर
15 लाखांपेक्षा जास्त रुपये वार्षिक उत्पन्न – 30 टक्के कर