दोन वर्षीय बालकाच्या फुफ्फुसात गेले डाळिंब बी

इंदापूर, 8 सप्टेंबरः इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील राजरत्न कडाळे या 2 वर्षीय बालकाला 6 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास डाळिंब खातेवेळी अचानक ठसका लागला. यामुळे डाळिंब बी राजरत्नच्या श्वास नलिकेतून त्यांच्या फुफ्फुसात गेल्याने तो बेशुद्ध पडला. राजरत्न बेशुद्ध झाल्याने त्याचे पालक खूपच घाबरले. अत्यावस्थेत असणाऱ्या राजरत्नला त्याच्या पालकांनी इंदापूर शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. लहू कदम यांच्याकडे तातडीने आणले.

बनावट पत्राच्या आरोपातून सोहेल शेख यांना सोडण्यासाठीचा अहवाल दाखल

सदर घटनेबाबत माहिती घेत डॉ. कदम यांनी तात्काळ नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुहास शेळके आणि भूलतज्ज्ञ डॉ. किसन शेंडे यांना पाचारण केले. यानंतर राजरत्नला कृत्रिम श्वासोच्छास सुरु करून ब्रांकोस्कोपी केली. डाळिंबाचे बी हे राजरत्नच्या उजव्या फुफ्फुसात गेले होते. हे बी बाहरे काढण्यासाठी डॉक्टरांना तब्बल दोन तास अथक प्रयत्न करावे लागले. सध्या राजरत्न हा बरा असून धोक्यातून बाहेर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *