बारामती, 26 डिसेंबरः दोन गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं एका तरुणाला चांगलेच भोवले आहे. या संदर्भात बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांना त्याचा सुगावा लावत दोन गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक केली आहे.
आकाश हजारे (वय 24, मुळ रा. शिंदेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर, सध्या रा. लकडेनगर, माळेगाव ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विजय वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अन्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, 24 डिसेंबर (रविवार) 2022 रोजी 11.30 च्या सुमारास आरोपी आकाश हजारे हा माळेगाव येथील पीर बाबाच्या दर्ग्याजवळ गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे हे पोलीस टिमसह सापळा रचला होता. त्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
दोन अग्निशस्त्र गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस विक्रीसाठी माळेगाव येथे आला होता. दरम्यान गावठी पिस्टल विकत घेण्यासाठी येणाऱ्या पार्टीला पोलिसांची चाहूल लागल्याने ते लांबूनच फरार झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश हजारे याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली होती. हजारे हा बेकायदेशीर गावठी पिस्टल व काडतुसे विकत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.
याबाबत आरोपी आकाश हजारे याची विचारपुस केली असता त्याने पोलिसांना उडवा उडविची उत्तरे दिली. त्यानंतर दोन पंचासमक्ष 50 हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस पोलीस उपनिरीक्षक, डी. आर. साळवे यांनी पंचनाम्याने जागीच जप्त केली.
2 Comments on “माळेगावातून दोन गावठी पिस्टल हस्तगत; एकाला अटक!”