दौंड, 30 डिसेंबरः सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ आहेत, जे क्षुल्लक कारणावरून वाद होऊन त्याचे रुपांतर मोठ्या हाणामारीत झाले आहेत. यातही कॉलेजमधील भांडणाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.
असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडला आहे. वरवंड येथील विद्यार्थांच्या दोन गटात 29 डिसेंबर 2022 रोजी फ्री स्टाईलने तुफान हाणामारीची घटना घडली आहे. शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे.
सदर भांडण सुरु असताना आजूबाजूच्या नागरिकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत शिकायला जातात की हाणामारी करायला जातात? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
One Comment on “विद्यार्थ्यांच्या दोन गटात फ्री स्टाईलने तुफान राडा”