बारामती, 4 ऑक्टोबरः “येताना शिक्षकांच्या केवळ समस्या आणि मर्यादा माहित होत्या, जाताना शिक्षणाच्या आधुनिक पद्धतीने समृद्ध होऊन जात आहोत.” “शालेय शिक्षणाचे भविष्यवेधी प्रशिक्षण आज मला मिळाले.” “सृजनात्मक काम करणारे शारदानगरचे सायन्स सेंटर ही आमच्यासाठी शिक्षणाची पंढरीच आहे.” “सर, मी माझ्या शाळेत आता केवळ लेक्चर घेणार नाही, तर मुलांकडून खूप सारे प्रयोग करून घेणार” या प्रतिक्रिया आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विज्ञान शिक्षकांच्या.
रविवार आणि सोमवार गांधी जयंती अशी जोडून आलेली सुट्टी कुठेतरी समुद्रकिनारी फिरण्यात घालवण्यापेक्षा होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबईचे डॉ. नरेंद्र देशमुख आणि राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा समितीचे प्रमुख डॉ. रविंद्र भास्कर यांच्या संकल्पनेतून 50 प्रयोगशील शिक्षकांना बारामती सायन्स सेंटरचे ग्लोबल एज्युकेशन मॉडेलचे ट्रेनिंग घेण्याचे निश्चित केले. त्याला बारामतीमधील शारदानगरच्या शिक्षणतज्ज्ञांनी दिलेले अनुभवांनी ते भारावून गेले आणि गांधी जयंती दिवशीच राष्ट्रपित्याला शैक्षणिक श्रद्धांजली वाहिली. शिक्षण क्षेत्रात एकीकडे अशैक्षणिक कामात गुंतलेले गुरुजन आपल्या कामाने त्रस्त झालेले दिसतात. दुसरीकडे बारा बारा तासांचा प्रवास करून दोन दिवस स्वखर्चाने प्रशिक्षण घेणारे असे उत्साही शिक्षक पाहिले कि शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या उज्वल भविष्याची आशा कायम दिसते.
भाजपाची वरात आरपीआयच्या दारात!
रविवार 1 ऑक्टोबर आणि सोमवार 2 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा समिती, महाराष्ट्र राज्य आणि बारामती सायन्स सेंटर यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रयोगशील 50 विज्ञान शिक्षकांनी बारामती सायन्स सेंटर येथे विविध देशांतील शिक्षणाच्या आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण घेतले. शारदानगर येथील विविध विषयतज्ज्ञांनी तयार केलेले ग्लोबल एज्युकेशन मॉडेल हे केवळ विविध देशांमधील उत्तम संकल्पना सांगणारे नाही तर त्या संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांना कशा वापरता येतील याचीही माहिती देणारे आहे.
श्री अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळ व ओंकारभैय्या जाधव मित्र परिवाराकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन
या प्रशिक्षणादरम्यान अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी शिक्षकांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले कि, “आज शिक्षणात नाविन्यपूर्ण बदल होत आहेत. आपल्या देशाची मोठी लोकसंख्या विचारात घेता जर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बंधने आणि प्रचलित व्यवस्था ही उत्पादकतेकडे नेली तर आपले भविष्य उज्वल आहे आणि हे काम शाळेत शिकवणारे शिक्षक उत्तम पद्धतीने करू शकतात. अशा प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन आणि मदत देण्यास आमचे सायन्स सेंटर भविष्यातही नेहमीच कटीबद्ध राहील.”
One Comment on “शारदानगरमध्ये दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न”