जोगवडीत शॉक लागून दोन गायींचा मृत्यू

बारामती, 9 सप्टेंबरः (प्रतिनिधी-बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील जोगवडी गावात 7 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11 च्या सुमारास विज खांबावरील तुटली. या तुटलेल्या तारेतून करंट पास होऊन जवळच तार कंपाउंडच्या आत बसलेल्या पशुपालक रमेश भोसले यांच्या मालकीच्या दोन गायींना शॉक लागला. यामुळे त्या दोन्ही गायी दगवल्या गेल्या.

यामुळंच भाजपाला बारामती हवीशी वाटतेय- सुप्रिया सुळेंचा भाजपला चिमटा

सदर घटनेबाबत वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार देण्यात आली. मिळालेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वारुळे हे टीमसह 8 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी घटनास्थळी येत सदर जागेचा पंचनामा केला. सदर अपघात हा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची माहिती स्थानिक अमर भोसले यांनी पोलिसांना सांगितली. सदर प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा डान्स

महावितरण कंपनीच्या काही खांबाच्या तारा या काही घरांवरून गेलेल्या आहेत. या घटनेनंतर अजूनही मोठे अनर्थ होऊ शकतात, महावितरण कंपनीने ते पोल दुसरीकडे स्थालांतर करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *