बारामती, 12 ऑगस्टः बारामती शहरात आजादी का अमृत महोत्सव निमित्त आज, ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर ही रॅली पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे तीन हत्ती चौकातून गुनवडी चौक येथे संपवण्यात आली.
बानप कंत्राटी कामगारांचा ठिय्या
विशेष म्हणजे या रॅलीत बारामती शहरातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यात शाळकरी विद्यार्थीनीचे लेझीम पथकही आले होते. यावेळी दिपक पेशवे, अविनाश मोटे, पाडुरंग कचरे, सतिश फाळके, अक्षय गायकवाड, संजय दराडे, साजन अडसूळ, शैलेश खरात, भारत देवकाते, ज्ञानेश्वर माने, अजित मासाळ, दिपक केसकर, पिकी मोरे, सरिका लोंढे, जी.बी.गावडे, प्रमोद डिंबळे, ननु तावरे, निलेश कोठारी, प्रमोद खराडे, अनिल जगताप, सचिन साबळे, अल्ताफ बागवान, युवराज तावरे, निलेश धालपे, विवेक पेडकर, गोविंद देवकाते, संदीप अभंग यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.