बारामती, 16 फेब्रुवारीः (प्रतिनिधी शरद भगत) बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथे भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक मंगळवारी, 14 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडली. बारामती तालुका भारतीय पत्रकार संघा तर्फे रत्नागिरीचे निर्भिड पत्रकार शशिकांत वारिशे यांना श्रद्धांजली वाहून पत्रकारांची विविध विषयावर चर्चा झाली. या चर्चेत पत्रकारांनी स्वःताची काळजी घेऊनच बातमी लावणे, एखाद्य पत्रकारावर अन्याय झाला तर संघ शांत बसणार नाही, असे ही संगणमताने निर्णय घेण्यात आला.
बारामतीत काळाबाजार करणाऱ्या गॅस रिफील सेंटरवर छापा
यावेळी लोणीभापकरच्या नवनिर्वाचित सदस्या स्वाती बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. या मासिक बैठकीसाठी बारामती तालुका अध्यक्ष काशीनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव सोमनाथ लोणकर, पत्रकार हल्ला कृती समिती प्रमुख निखिल नाटकर, सुशिलकुमार अडागळे, अजय पिसाळ, काकडे, अविनाश बनसोडे, शांतनु साळवे, संजय कुंभार, शरद भगत आदी पत्रकार उपस्थित होते.
राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
लोणीभापकरचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य रविकाका भापकर, उपसरपंच नानासो मदने उपस्थित होते. लोणी भापकरच्या ग्रामपंचायती लगत असणारे अंदाजे 100 वर्षाचे झाड संबधित अधिकार्याच्या कायदेशीर परवानगीने पाडण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य रविकाका भापकर यांनी पत्रकारांविषयी विचार मांडले. या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन अविनाश बनसोडे यांनी केले.
One Comment on “शशिकांत वारिशे यांना श्रद्धांजली वाहिली”