बारामती, 21 डिसेंबरः(प्रतिनिधी- शरद भगत) सध्या अनेकजण हे आपला वाढदिवस साजरा करताना खूप खर्च करतात. मात्र असेही काहीजण आहेत, जे वाढदिवसावर होणार अपव्यय खर्च टाळून विधायक कामे करून वाढदिवस साजरा करत असतात. असाच वाढदिवसावर होणार अपव्यय खर्च टाळून बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील उद्योजक सतिश जगदाळे यांनी गावात झाडे आणि ट्री गार्ड देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बारामतीत सकल जैन समाजाच्या वतीने मुक मोर्चा!
मुर्टी गावातील उद्योजक सतिश जगदाळे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त गावासाठी 5 झाडे आणि 5 ट्री गार्ड दिली. सतिश जगदाळे हे मुर्टी गावामध्ये शैक्षणिक, सामाजिक कार्यात सदैव मदत देत असतात, अशी माहीती मुर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे यांनी दिली. मुर्टी गावामध्ये तरुणांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षां पासून चालू आहे.
गावात सतिश जगदाळे आणि शुभम भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्यात आली. यावेळी उपसरपंच किरण जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते हरिदास जगदाळे, धनंजय जगदाळे, प्रशांत जगताप, मयुर जगदाळे, दत्ता भोसले, रवि शिंदे आणि पत्रकार शरद भगत उपस्थित होते.
मोरगांव ग्रामपंचायत निवडणूक झाली चुरशीची!
2 Comments on “वाढदिवसानिमित्त मुर्टी गावात वृक्षारोपण”