बारामतीत डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण

बारामती, 2 ऑक्टोबरः बारामती येथील कृषि विज्ञान केंद्र येथे 4 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचे आयोजन कृषि विभाग महाराष्ट्र शासन, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, कृषि विज्ञान केंद्र बारामती व बारामती तालुका सहकारी फलोत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्त बारामती प्रशासनाकडून अभिवादन

जिल्ह्याचे नवे पालकमंत्री घेणार संन्यास?

या एक दिवशीय प्रशिक्षणास तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामुळे बारामतीसह इंदापूर, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील इच्छुक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणास आधार कार्डसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *