झारखंड येथे रेल्वेचे डबे रुळावरून घसरले; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

चक्रधरपूर, 30 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई (गाडी क्रमांक 12810) एक्सप्रेसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही रेल्वे हावडाहून मुंबईला जात होती. त्यावेळी चक्रधरपूर जवळ आल्यावर रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे 3:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर याठिकाणी बचावकार्य सुरू झाले. एनडीआरएफची टीम घटनास्थळी तसेच एआरएमई कर्मचारी, एडीआरएम सीकेपीसह घटनास्थळी उपस्थित आहेत. सध्या बचावकार्य पूर्ण झाले आहे.

https://x.com/AHindinews/status/1818163631588245751?s=19

https://x.com/AHindinews/status/1818125332802609172?s=19

https://x.com/AHindinews/status/1818138264601235675?s=19

https://x.com/AHindinews/status/1818140102931214459?s=19

रेल्वेची वाहतूक खंडित

दरम्यान, हावडा-सीएसएमटी एक्सप्रेसचे सुमारे 18 डबे रुळावरून घसरले. त्यानंतर ही रेल्वे तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. मात्र, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातामुळे रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडून पडली आहे. या रेल्वे अपघातानंतर हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याची रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ

पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी बहुतांश प्रवासी झोपेतच होते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावू लागले. दरम्यान, या रेल्वे अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. या ट्रेनच्या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. यावेळी जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या या अपघाताचा तपास रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. त्यानंतरच या अपघाताचे खरे कारण समजू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *