बारामतीत वाढली वाहतूक कोंडी

बारामती, 23 ऑक्टोबरः बारामती शहरातील बाजारपेठेत दिवाळी सणासुधीमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तसेच शहरातील सम विषम पार्किंग व्यवस्थेला स्थगिती दिली आहे. तसेच शहरातील काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

बारामती शहरात पोलिसांचं ढिसाळ वाहतूक नियोजन

मात्र शहर पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. बारामती शहरातील बाजार पेठांसह इंदापूर रोड, भिगवण रोड, कसबा रोड, गुणवडी रोड, यासह ख्रिचन कॉलनी मार्गे टि.सी. कॉलेज आणि तांदूळवाडी रोज या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक हे मिळेल त्या मार्गाने वाट काढताना दिसत आहे. मात्र यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. असाच प्रकार भिगवण रोडवरून गुल पुनावाला मार्गे टि.सी. कॉलेज रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा व्हिडीओ समोर आला आहे. या वाहतूक कोंडीकडे बारामती शहर पोलिसांकडून अक्षरशः दुर्लक्ष होताना दिसत आहे.

बारामतीत सम-विषम पार्किंगला स्थगिती

One Comment on “बारामतीत वाढली वाहतूक कोंडी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *