बारामती नगरपरिषदेच्या धोरणाविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार!

बारामती, 26 नोव्हेंबरः(अभिजीत कांबळे) बारामती शहरातील जुन्या मंडई येथील व्यापाऱ्यांना नगरपरिषदेच्या नव्या धोरणाविरोधात शुक्रवारी, 25 नोव्हेंबर 2022 रोजी बंद पुकारला होता. बारामती नगरपरिषदेकडून जुन्या मंडईला हटवून, त्या ठिकाणी चार मजली बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. या विरोधात जुन्या मंडई येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंदचे आयोजन केले होते.

दरम्यान, बारामती नगर परिषदेने गणेश मंडईच्या ठिकाणी बहुमजली इमारत 2014 साली तयार करण्यात आली. तब्बल 17 कोटी रुपये खर्च केल्यानंतर 2016 साली मंडईतील व्यापाऱ्यांना ताबा दिला. मात्र हा ताबा लिलाव न करताच केला गेल्याचा आरोप होत आहे. सदर गणेश मंडईच्या नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील काही गाळे अजूनही ओसाड पडले आहेत.

बारामती नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंताच्या चुकीच्या धोरणामुळे इमारतीवर पार्किंग करण्यात आले. मात्र सदर इमारतीत अग्नीशमनची व्यवस्था नसल्याने भविष्यात संभव्य अपघात झाला तर कुठलीही उपाय योजना नाही. यामुळे सदर इमारतीत वाहनांची पार्किंग करताना अनेकजणांमध्ये भीती आहे. सदर इमारतीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाल्याची कबुली बारामतीमधील नेत्यांनी दिल्या असल्याचीही अफवा आहे. त्याच धरतीवर पुन्हा एकदा तीच चूक जुन्या मंडईत चार मजली इमारतीत होताना दिसत आहे.

महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन

आता मात्र बारामतीत ठेव अंशदान अंतर्गत पुणे विभागाच्या सार्वजनिक बांधकाम (पुर्व)चे कार्यकारी अभियंता यांना वर्ग केले आहे. विकासाचं आणि कमिशनचं मॉडेल तयार होत असताना याच विभागाने या अगोदर बारामतीत मेडिकल कॉलेजचे बांधले आहे. मात्र मेडिकल कॉलेज अद्याप पुर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही. सदर मेडिकल कॉलेज इमारतीचे काम निकृष्ट दर्जाने झाल्याने पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. तसेच इमारतीच्या काही भिंतींना आताच चिरा गेल्या आहेत. त्याच संबंधित विभागाला बारामती नगरपरिषदेने जुन्या मंडईच्या नवीन चार मजली बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे कंत्राट दिले आहे. सदर नवीन होणाऱ्या बहुउद्देशीय इमारतीचे काम हे निकृष्ट दर्जाचेच होणार आहे, हे बारामतीतील हुशार व्यापाऱ्यांना पुर्ण कल्पना आहे. यामुळे बारामती नगरपरिषदेच्या नव्या धोरणाविरोधात 25 नोव्हेंबर रोजी कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.

मुर्टीच्या ‘या’ रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य

One Comment on “बारामती नगरपरिषदेच्या धोरणाविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *