पुणे, 25 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात आज तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत सध्या थंडीचे वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत आज थंडी वाढल्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे येत्या 24 तासांत राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा याठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आज आणि उद्या राज्यातील बहुतांश भागांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या काळात आकाश निरभ्र राहणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
https://twitter.com/anupamkashyapi/status/1750174018240737342?s=19
राज्यभरात आज थंडीची हुडहुडी!
तत्पूर्वी, आजच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वात कमी पुणे आणि नाशिक याठिकाणी 8.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. तसेच आज परभणी 10.9 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 9.4 अंश सेल्सिअस, सातारा 11.3 अंश सेल्सिअस, उदगीर 10.7 अंश सेल्सिअस, जळगाव 9.3 अंश सेल्सिअस, बारामती 8.7 अंश सेल्सिअस, जालना 11 अंश सेल्सिअस आणि मालेगाव 9.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
पुण्यात देखील चांगलाच गारठा वाढला
पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील आज थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आजच्या दिवशी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. शिरूरमध्ये आज 7.4 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. तर आजच्या दिवशी लव्हळे 17 अंश सेल्सिअस, वडगाव शेरी 17, लोणावळा 16.2, मगरपट्टा 15.6, चिंचवड 14.9, खेड 14.7, कोरेगाव पार्क 14, बल्लाळवाडी 13.4, गिरीवन 13.1, दापोडी 13, भोर 12.7, हडपसर 12.2, इंदापूर 11.1, लवासा 11, पुरंदर 10.9, तळेगाव दाभाडे 10.4, तळेगाव ढमढेरे 10.3, आंबेगाव 10, नारायणगाव 10, पाषाण 9.5, राजगुरुनगर 9.4, दौंड 9.2, शिवाजीनगर 8.6, हवेली 7.8 आणि शिरूर 7.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.