तिरुवनंतपुरम, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून या मालिकेतील आघाडी कायम राखण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ आजचा सामना जिंकून या मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
— BCCI (@BCCI) November 25, 2023
दगडफेकीचा कट कोणी रचला? नितेश राणेंचा शरद पवारांना सवाल
तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. तसेच जास्त आर्द्रता आणि ओलसर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करू शकते. त्यामुळे या सामन्यावर गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. तर या सामन्यादरम्यान खेळपट्टीवर दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले 209 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 1 चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. त्याचबरोबर भारतीय संघाने त्यांच्या आजवरच्या टी-20 इतिहासातील सर्वाधिक धावांचे लक्ष्य पार केले. भारताच्या या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने या सामन्यात 42 चेंडूत 80 धावांची खेळी केली. त्याला ईशान किशनने 58 धावांची खेळी करत चांगली साथ दिली होती. त्यामुळे भारतीय संघाने आजच्या सामन्यात देखील दमदार कामगिरी करून विजय मिळवावा, अशी अपेक्षा क्रिकेट चाहते करीत आहेत.
One Comment on “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी-20 सामना”