इंदापूर, 19 जुलैः (प्रतिनिधी- दयावान दामोदरे) गेल्या काही वर्षांपासून बारामती तालुक्यासह दौंड, इंदापूर तसेच फलटण तालुक्यात बोगस वसुली एजेंट गुंडांचे जाळे फोफावले आहे. सर्वसामान्य व्यक्ती हा दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, आदी गाड्या घेण्यासाठी बँक तसेच वित्तीय संस्थांकडे मोठ्या आशेने जात असतो. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या व्यक्तीचे काही हप्ते थकतात. हे हप्ते वसुल करण्यासाठी बँक तसेच वित्तीय संस्थांच्या खाजगी वसुली एजेंट गुंडांमार्फत कर्जदाराला आर्थिक तसेच मानसिक त्रास दिला जातो. या त्रासाला कंटाळून इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी (लिंबोडी) गावातील एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवारांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून शरद पवारच गायब!
इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी (लिंबोडी) येथील संतोष महादेव माने आणि त्यांची पत्नी सुलभा संतोष माने यांनी मोठ्या हौशीने टाटा मोटर्स फायनान्स लिमीटेड, पुणे कंपनीची ZEST XE (MH 42 AQ 9945) गाडी फायनान्स करून घेतील. मात्र संतोष माने यांचे 9 ते 10 हप्ते थकले. यामुळे फायनान्स कंपनीच्या बोगस वसुली एजेंट गुंडांकडून संतोष माने आणि त्यांची पत्नी सुलभा माने यांना वसुलीवरून मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात सुरुवात केली जाऊ लागली. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून सुलभा संतोष माने यांनी दिनांक 26 जून 2023 रोजी रात्री 11.40 च्या सुमारास राहत्या घरात अँगलला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर 27 जून 2023 रोजी रात्री 10 ते 28 जून 2023 रोजी सकाळी 7.45 च्या दरम्यान, संतोष माने यानेही राहत्या घरात अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
सदर आत्महत्या प्रकरणात बावडा पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल संबंधित फायनान्सच्या 4 बोगस वसुली एजेंट गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
जरी पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत असले तर प्रश्न अजूनही तसाच आहे. तथाकथित बँक, वित्तीय संस्था तसेच फायनान्स कंपनींचे बोगस वसुली एजेंट गुंडांचा सर्वसामान्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास हा छुप्या पद्धतीने सुरुच आहे. अशी किती कुटुंब या बोगस वसुली एजेंट गुंडांचा त्रास अद्यापही सहन करत आहेत. या बोगस वसुली एजेंट गुंडांवर पोलीस कारवाई कधी करणार? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. अजून किती दाम्पत्यांची आत्महत्या संबंधित प्रशासन पाहणार आहे? हा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.
मुर्टी गावात खाजगी कामासाठी वृक्षतोड!