तीन वाहनांचा भीषण अपघात, 15 जण जखमी

वाशिम, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) वाशिम जिल्ह्यातील रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. यावेळी वाशिम जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर नागपूर महामार्गावरील तराळा फाट्याजवळ दोन खाजगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बचावकार्य सुरू करून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर या अपघातात जीवितहानीचे वृत्त नाही.

https://x.com/airnews_pune/status/1804025696647274595?s=19

तीन वाहने एकमेकांना धडकली

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील संभाजीनगर नागपूर महामार्गावर आज सकाळी 6 वाजता हा अपघात झाला. यावेळी या दोन खाजगी बसेस नागपूरकडे जात होत्या. तर ट्रक नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होत्या, असे सांगितले जात आहे. त्यावेळी तराळा फाट्याजवळ या तिन्ही वाहनांची आपापसात जोरदार धडक झाली. या अपघातात तिन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.



या अपघातामुळे तेथील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नागपूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि येथील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *