बारामती, 21 ऑगस्टः बारामती शहरात आज, 21 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या उत्सहात नागपंचमी साजरी झाली. सकाळपासून महिला वर्ग पुरणपोळीच्या स्वयंपाकात गुंतल्या होत्या तर सकाळपासूनच पुरुष मंडळी नागपंचमीनिमित्त पतंग उडविण्यात मग्न होते. मात्र आज, सोमवारी शहरात ठिकठिकाणी नायलॉन मांजामुळे तीनजण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे.
सध्या एकजणाला नायलॉन मांजा कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदरची घटना ही बारामती हद्दीत बारामती फलटण रोडवर घडली आहे. या घटनेत बारामती येथील महेश चव्हाण (वय- 23 वर्षे) नावाचा व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. महेश चव्हाण याला गाडीवरून जात असताना पतंगीचा नायलॉन मांजा कापला आहे. यात त्याच्या ओठापासून मानेपर्यंतची त्वचा कापली गेली आहे. महेश चव्हाणवर सरकारी रुग्णालय बारामती येथे उपचार सुरु आहे.
बारामतीत घरफोडी करणाऱ्यांचा व्हिडिओ आला समोर!
तर दुसऱ्या घटनेत दोन व्यक्ती गाडीवर जात असताना त्यांना पतंगीचा नायलॉन मांजा कापला गेला. या घटनेत वैभव दत्तात्रय खरात (वय- 18 वर्षे), अंजना दत्तात्रय खरात (वय- 40 वर्षे) गंभीररित्या जखमी झाल्या आहे. या दोघांवर महिला शासकीय रुग्णालय, बारामती येथे उपचार सुरु आहे.
वरील घटनेनंतर बारामती शहरात नागपंचमी दिवशी सर्रासपणे नायलॉन मांजा विक्री झाल्याचे निदर्शनात आले. यामुळे बारामतीत पोलिसांचा पुन्हा कुमकुवत नियोजन आणि हलगर्जीपणा दिसून आला. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजाच्या गंभीर घटनांमुळे सरकारकडून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही सर्रासपणे बारामती शहरात नायलॉन मांजा विक्री केल्याने आजसारख्या घटना दिसत आहे. या सर्व घटनेला जबाबदार कोण? असा सवाल जनसामान्यांकडून विचारण्यात येत आहे.
प्रबुद्ध युवक संघटनेकडून घर घर तिरंगा वाटप
दरम्यान, नायलॉन बंदीनंतर पोलिसांकडूनही छोट्या मोठ्या कारवाया केल्याच्या दाखवण्यात आल्या. मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीने तर काही ठिकाणी उघडपणे अजूनही नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. मात्र यावर पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का? असा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे. निदान बारामतीत तरी नायलॉन मांजा हद्दपार होणार का? की आणखीन किती बळी घेतल्यानंतर नायलॉन विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
2 Comments on “नायलॉन मांजामुळे तीनजण मरता मरता वाचले!”