संभाजीनगर, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे अनेक मेसेज पाठवल्याप्रकरणी एका तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सौदागर सातनाक असे भुजबळ यांना धमकीचे मेसेज पठवणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याने मंत्री छगन भुजबळ यांना लागोपाठ 12 धमकीचे मेसेज पाठवले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानूसार सौदागर सातनाक या तरूणाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर याप्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे काही दिवसांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. त्यावेळी ह्या लग्न समारंभातच छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर सौदागर सातनाक याने धमकीचे लागोपाठ मेसेज पाठवले. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. त्यानूसार आता याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. तर या तरूणाला आता पोलीस अटक करणार असल्याचे म्हटले जात आहे.
गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाद सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. तर छगन भुजबळ यांनी त्यांच्या या मागणीला विरोध केला आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
तेंव्हापासून छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना सातत्याने धमकीचे मेसेज आणि फोन येत आहेत. तसेच त्यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर, छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या निवासस्थानच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
One Comment on “छगन भुजबळ यांना धमकीचे मेसेज; गुन्हा दाखल”