मुंबई, 14 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले होते. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना धमकीचे फोन आणि मेसेज आले आहेत. यासंदर्भातील माहिती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे. यासोबतच आपली सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली
तत्पूर्वी, विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी करून जरंगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. असे ते म्हणाले होते. तसेच कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली होती. याशिवाय काही मराठा नेते ओबीसी आरक्षणाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार
त्यानंतर विजय वडेट्टीवार यांना धमकीचे फोन आणि मेसेज आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील दोषींवर कारवाईचे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानूसार पोलीस दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. तसेच लवकरच विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा देखील वाढविण्यात येणार आहे.
One Comment on “विजय वडेट्टीवार यांना धमकी; सुरक्षा वाढवणार”