बारामती, 10 ऑगस्टः बारामती शहरातील प्रसिद्ध पेट्रोल पंप दोन दरोडेखोरांकडून पिस्टुलाचा धाक दाखव लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बारामती- पाटस रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगर सेवक किरण गुजर यांच्या मालकीचे कृष्णा पेट्रोल पंपावर सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली.
सदर घटनेत पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मयुर शिंदे यांनी प्रतिकार केल्याने दरोडेखोर रोकड न घेता तेथून प्रसार झाले आहेत. मात्र या घटनेत मयुर शिंदे जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर घटनेची प्राथमिक माहिती घेत जखमी मयुर शिंदेंना प्राथमिक उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले.
कृषिदुतांकडून चाकोरे गावात शेतीत आधुनिक प्रयोग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट 2023, सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मयुर शिंदे हे नेहमी प्रमाणे पेट्रोल पंपावरील रक्कमेचा भरना बारामती सहकारी बँकेत करण्यासाठी शहरातील बँकेकडे निघाले होते. यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरुन दोन जण मास्क लावून शिंदेंजवळ आले. त्यांच्याकडील असणारी पिस्तुल काढत त्यांनी शिंदेंकडील बॅग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर बॅग मयुर शिंदेंनी पोटाखाली दाबून ठेवून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात झटापटीत दरोडेखोरांकडूनही शिंदेंकडून बॅग घेण्यासाठी मारहाण करण्यात आली. यात शिंदेंना जखमा देखील झाल्या आहेत.
सदर घटनेचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या सुचनेनुसार आणि मार्गदर्शनात संबंधित तपास वेगाने फिरवून या प्रकरणातील आरोपींना काही तासांच्या आताच बेड्या ठोकल्या.
बारामती तालुक्यातील दुष्काळ गावांचा रखडलेला प्रश्न आमदार पडळकरांच्या दरबारी!
सदर गुन्ह्याच्या तपासात बारामती शहर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, बारामती तालुका, भिगवण, माळेगाव, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन या मार्फत तपास सुरु केला. तसेच वेगवेगळ्या टीम तयार करून गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास केला. या प्रकरणात संबंधित पेट्रोल पंपावरील एक कामगार, तसेच त्याचे इतर दोन साथीदारांना अटक केली. सदर आरोपींना अटक केल्यानंतर बारामती येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सपोनि सचिन काळे, सपोनि प्रकाश वाघमारे, सपोनि दिलीप पवार, सपोनि गावडे, पोसई अमित सिदपाटील तसेच सहाय्यक फौजदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, राजू मोमीन, सागर क्षीरसागर, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले, बाळासाहेब खडके, अतुल डेरे, गुरू जाधव, रामदास वावर, काशीनाथ राजापुरे, अक्षय शिताफ, मनोज पवार, सागर जामदार, दशरथ इंगोले, यशवंत पवार, सचिन कोकणे आदींचा समावेश होता.
One Comment on “पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक”