भाजप कार्यालयाला काळं फासणाऱ्यांना अखेर अटक!

बारामती, 13 डिसेंबरः बारामती शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर रोड लगत असणाऱ्या बोर्डवर व कार्यालयाच्या बोर्डवर आज, 13 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजता काळा रंग टाकण्यात आला. तसेच रंग टाकतानाचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाला.

बारामतीमधील भाजप कार्यालयाला भिमसैनिकाने फासलं काळं!(व्हिडीओ)

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलिसांनी तात्काळ सदर व्हिडीओमध्ये रंग टाकताना दिसणारे सचिन जगताप (वय 38, रा. बारामती) व कृष्णा सोनवणे (वय 50, रा. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता, या दोघांनी रंग टाकताना सचिन जगताप यांच्या कॅमेऱ्यामध्ये महादेव मिसाळ यांनी हा व्हिडीओ काढल्याचे सांगितले आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सचिन जगताप याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकन प्रसारित केला आहे.

सध्या महाराष्ट्रात आंदोलने व प्रति आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या बोर्डवर काळा रंग टाकल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा रंग टाकून व्हिडीओ काढून प्रसारित केला. त्यातून सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न झाला. तसेच जिल्हाधिकारी यांचा आंदोलने, मोर्चे या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 प्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होऊ नये व सुरक्षिततेला धोका होऊ नये, म्हणून ज्या कृती करण्यास प्रतिबंध केलेल्या आहे, अशा प्रकारचे कृती केल्याने ताब्यात घेतलेल्या संशयित तिघांविरुद्ध पोलिसांनी भादवि कलम 153, 505, 427 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)चे उल्लंघन झाले म्हणून 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

चंद्रकांत पाटलांचा निषेध व्यक्त करताना?

2 Comments on “भाजप कार्यालयाला काळं फासणाऱ्यांना अखेर अटक!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *