मुंब्रा, 12 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण आज जालन्यातील अंतरवली सराटीत जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अंतरवली सराटी गावात जाईल, पण घराचा उंबरठा ओलांडणार नाही, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या शाखेचा वाद आता कोर्टात रंगणार
मी माझ्या गावाकडे निघालो आहे. मात्र त्यावेळी मी माझ्या घरी जाणार नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे यंदा आपण दिवाळी साजरी करणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात येत्या 15 नोव्हेंबरपासून राज्यात दौरा करणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. या दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण येथील मराठा बांधवांना भेटणार आहेत.
मराठा आरक्षण आम्ही घेणारच आहे. दमाने का होईना पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी मी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे ही तारीख बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर; उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 25 ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषणाला सुरूवात केली. यावेळी राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने विविध आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. तसेच यावेळी काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना देखील घडल्या. ही चिघळत चाललेली परिस्थिती पाहता, उपोषणाच्या नवव्या दिवशी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटले. त्यावेळी या शिष्टमंडळाने त्यांच्याशी मराठा आरक्षण संदर्भात चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर रोजी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे, असा दावा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला होता.
2 Comments on “यंदा मी दिवाळी साजरी करणार नाही – जरांगे पाटील”