यंदा गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम धुमधडाक्यात

मुंबई, 21 जुलैः यंदाच्या वर्षी राज्यभरात गणेशोत्सव, दहीहंडी यासह मोहरम धुमधडाक्यात साजरा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सणांवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासह गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा मागे घेण्यात आली आहे. तसेच मंडळ नोंदणीमध्येही सूट दिली आहे. गणेशोत्सव साजरी करताना आगमनाच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्यात येणार आहे. यासह गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

बारामती शहर पोलिसांचे माणुसकीचे दर्शन

दरम्यान, मुंबईमधील सर्व गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांची आणि संघटनांची आज, 21 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम हे सण धुमधडाक्यात साजरा होणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करताना काही नियम बंधनकारक असणार आहे. यासह मुंबईतील नियमावली संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहेत. तसेच सणांच्या काळात ज्यांच्यावर यासंबंधी काही छोटे-मोठे गुन्हे दाखल झाले होते, ध्वनिप्रदूषणासंबंधी ज्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते, त्यासंबंधीत अभ्यास करुन शक्य ते गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *