मुंबई, 9 सप्टेंबरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांच्या बारामती दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला चांगल्या गोष्टींचा मोह असतो, तो मोह भाजपालाही आहे. त्यामुळे त्यांना बारामती हवी असेल, असा चिमटा सुप्रिया सुळेंनी भाजपला काढला.
बारामतीत गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा डान्स
बारामती हा देशातील खूप विकसित मतदारसंघ आहे. हे मी आकड्यांच्या आधारे बोलत आहे. बारामतीच्या जनतेनं कष्ट करून हा मतदारसंघ आणि तालुका विकसित केला आहे. खूप लोकांनी त्यासाठी त्याग केला आहे. त्यामुळं ते हवंसं वाटणं, यात काही गैर नाही. प्रत्येकाला चांगलीच गोष्ट हवी असते, असं विधान सुप्रिया सुळे यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केलं.
अजित पवारांनी घेतली नाना पाटेकरांची भेट
बारामतीची आयआयटी आणि आयआयएम या संस्थांशी सुप्रिया सुळेंनी तुलना केली आहे. बारामतीबद्दल भाजप जे काही प्रेम दाखवतायत, त्याचं मी मनापासून स्वागत करते. प्रत्येक माणसाला आयआयटी, आयआयएममध्येच अॅडमिशन का हवी असते?, कारण देशातील सगळ्यात चांगल्या आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून त्याकडं पाहिलं जातं. तसंच बारामतीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामतीच्या संदर्भात म्हटलं तर मी संविधानावरती विश्वास ठेवते. त्यावेळेस मला जेपी नड्डा यांचे वाक्य आठवतं की, या देशांमध्ये एकच पार्टी राहिली पाहिजे. पण मी संविधानाप्रमाणे अनेक पार्टी राहावी, या मताची आहे. बारामतीमध्ये कोणीही यावं, त्यांचं स्वागत असेल, असंही त्या म्हणाल्या.