राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत ‘हा’ गोलंदाज

जयपूर, 23 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल मधील राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझीने मोठी घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक आणि वेगवान गोलंदाजीच्या प्रशिक्षक पदी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड याची नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील माहिती राजस्थान रॉयल्सने ट्विट करुन दिली आहे. त्यामुळे शेन बाँड हा आपल्याला 2024 च्या आयपीएल हंगामात राजस्थानच्या दुहेरी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे.

औरंगाबादमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

याच्या आधी शेन बाँड हा आयपीएल मध्ये 2015 पासून मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करीत होता. त्याने त्याच्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या यांसारख्या अनेक गोलंदाजांना मोलाचे प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये 2015 पासून जबरदस्त कामगिरी करता आली. शेन बाँडने आता प्रशिक्षक पद सोडल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा मोठा फटका बसू शकतो. तर दुसरीकडे मात्र शेन बाँडच्या प्रशिक्षणाचा राजस्थानच्या गोलंदाजांना फायदा मिळू शकतो.

मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये- एकनाथ शिंदे

राजस्थान रॉयल्सच्या संघात सध्या प्रसीध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ओबेद मॅककॉय, केएम आसिफ यांसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात राजस्थानच्या गोलंदाजीत सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्ससोबत करार केल्यानंतर शेन बाँडने प्रतिक्रिया दिली आहे. “राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी होताना मला आनंद होतोय. ही एक दूरचा विचार करणारी फ्रँचायझी आहे जी चांगली कामगिरी करण्यासाठी वचनबद्ध आहे. मी त्यांचा भाग बनण्यासाठी उत्सुक आहे. तर राजस्थानच्या गोलंदाजीत तरुण आणि अनुभवी गोलंदाजांचे उत्तम मिश्रण आहे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मला आनंद वाटेल,” असे शेन बाँड यावेळी म्हणाला.

2 Comments on “राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत ‘हा’ गोलंदाज”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *