मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना कृतज्ञतापूर्वक मी वंदन करतो.”
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर राज्यपाल मा. रमेश बैस जी, मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यासमवेत पुष्पचक्र अर्पण करून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. pic.twitter.com/mvs93DUJvR
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 6, 2023
जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री शिंदे
“देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असताना, समाजात समता आणि बंधुता रुचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यशस्वी लढा दिला. सामाजिक मानवी मूल्यावर आधारित जगातील सर्वोत्कृष्ट राज्य घटनेची निर्मिती बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ राजकारणी, समाजकारणी नव्हते, तर ते ज्ञानवंत, गुणवंत, प्रज्ञावंत, तत्त्वचिंतक विचारवंत होते. शिक्षकतज्ञ, अर्थतज्ज्ञ, शेतीतज्ञ, संरक्षकतज्ञ म्हणून देखील त्यांचे कार्य अलौकिक आहे. लेखक, चित्रकार, पत्रकार समाजव्यवस्थेचे अभ्यासक आणि दूरदृष्टीचे प्रशासक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 100 वर्षापूर्वीच्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1923 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. ही गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आहे. तसेच मुंबईत इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील या स्मारकाचे काम लवकर कसे पूर्ण होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. असे ते यावेळी म्हणाले.
रविंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने हॉलीबॉलचे मैदान सुरु
“या स्मारकाच्या उंचीमुळे थोडा विलंब लागला आहे. तसेच बाबासाहेबांच्या या स्मारकाच्या कामाला निधीची कसलीही कमतरता भासणार नाही, हे मी अर्थमंत्री या नात्याने सांगतो. सामाजिक कार्यामध्ये तसेच न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या सामाजिक न्यायाचा मार्ग आमच्यासाठी महायुती सरकारसाठी आदर्श आहे. त्याच आदर्शावर आमची वाटचाल सुरू आहे.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
One Comment on “बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला निधीची कमतरता भासणार नाही – अजित पवार”