बारामती, 13 मेः बारामती नगर परिषदेचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग रचना सर्वसाधारण लोकांसाठी जाहीर झाले आहे. एकूण 20 प्रभाग असून 41 उमेदवार निवडून येणार आहेत. प्रभाग क्रमांक 1 ते 19 प्रत्येकी 2 उमेदवार व प्रभाग क्रमांक 20 मध्ये 3 उमेदवार निवडून येणार आहेत. एकूण लोकसंख्या 1 लाख 8 हजार 152 आहे. अनुसूचित जातीची 20 हजार 326 लोकसंख्या आहे. तर या वेळेस नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याचा अंदाजाने अनुसूचित जातीमध्ये स्पर्धा वाढली आहे. तसेच यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
प्रभाग रचना ही नियम बाह्य केल्याचे अनेक राजकीय कार्यकते बोलत आहे. निवडणूक राज्य आयोगाचे मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवून प्रभाग रचना केल्याचा आरोप इच्छुक उमेदवार करत आहेत. ही निवडणूक सोपी न करता अवगड करण्याचे काय प्रशासनाने केले आहे. प्रभाग रचनेच्या नकाशामध्ये नदी, नाले, ओढे, कॅनॉल, रेल्वेलाईन, रस्ते, गल्ली गोळ्या दर्शवली नसल्यामुळे प्रभाग रचना निश्चित करताना राजकीय दबाव असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. अनेक प्रभाग मुख्य कुणापासुन वेगळे केलेले आहेत, लोकसंख्येची अटी मान्य करण्यासाठी गोल आयताकृती चौकोनी प्रभाग रचना करण्यापेक्षा तोडमोड करून प्रभाग रचना केली आहे. त्यामुळे अनेक पक्ष कार्यकर्ते विधी तज्ज्ञांकडे बसून प्रभाग रचनेवर हरकती घेण्याची प्रक्रिया चालू आहे. उद्या दिनांक 14 मे 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हरकती घेण्याची मुदत असल्याने कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली आहे.