ट्रक खड्ड्यात पडला तिथे 100 वर्षांपूर्वी एक विहीर होती, मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे, 22 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातील लक्ष्मी रोड परिसरातील समाधान चौक येथील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात रस्ता खचल्याने पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक अचानकपणे खड्ड्यात पडल्याची घटना घडली होती. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. विरोधकांच्या या टीकेला नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

https://x.com/ANI/status/1837379241316622693?s=19

मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

हा रस्ता महानगरपालिका किंवा सरकारचा नव्हता. ही एक खाजगी जागा होती, त्या जागेत सुमारे 100 वर्षांपूर्वी एक विहीर होती, नंतर ती विहीर झकण्यात आली होती. परंतू याठिकाणी एक जड ट्रक आला आणि तो या विहिरीत पडला. त्यानंतर विरोधकांनी याबाबत समज निर्माण करून टीका केली होती की, हे सर्व प्रशासन तसेच भाजपच्या काळात झालेले आहे. त्यावरून पुणे शहराला वारंवार बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. वस्तुस्थिती वेगळी होती परंतु, वेगळेच दाखविण्यात आले. त्यामुळे मला वाटते की, जे झाले ते चुकीचे झाले. वास्तविक, जिथे ही घटना घडली आहे, तिथे सरकारची कसलीही जागा किंवा रस्ता नाही. या घटनेचा तपास केला जाईल, असे देखील मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

https://x.com/ANI/status/1837130338071630106?s=19

अशी घडली घटना

दरम्यान, 20 सप्टेंबर रोजी पुणे शहरातील लक्ष्मी रोड परिसरातील समाधान चौक येथील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात रस्ता खचल्याने पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक अचानकपणे 30 ते 40 फूट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली होती. पुणे महानगरपालिकेचा ट्रक याठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आला होता. त्यावेळी हा ट्रक खाली जात असल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना काही तासांच्या अथक परिश्रमानंतर हा ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *