मुंबई, 25 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राजस्थानमधील एका भाजप उमेदवाराच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा ‘हिंदूहृदयसम्राट’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “देशातच नाही, तर जगात हिंदुहृदयसम्राट फक्त एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. संतापजनक म्हणजे पक्ष, नाव चोरणारे आता ही उपाधीही चोरायला बघत आहेत. अशांना राजकारणात गाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत लोक येत आहेत.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा?
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 23, 2023
जगात 'हिंदुहृदयसम्राट' फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे!
त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल!
जनता दूधखुळी नाहीये,
सगळ्याचा हिशोब होणार! pic.twitter.com/nBJrne46Lb
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतणार?
दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. तसेच आपण लवकरच लवकरच पालघर येथे जाहीर सभा घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. “मी कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही तर वृत्तीविरोधात आहे. गुलामगिरी मला मान्य नाही आणि तुम्हालाही कुणाचा गुलाम होऊ देणार नाही. त्यामुळे मी लढायला उतरलो आहे. आपल्याला ही हुकुमशाही आताच तोडून टाकावी लागणार आहे. भगवा झेंडा आपल्याला पुन्हा एकदा फडकवायचा आहे.” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राजस्थानमध्ये गेले होते. त्यावेळी राजस्थानमधील एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावासमोर ‘हिंदुहृदयसम्राट’ असे लिहिले होते. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने एक ट्विट करण्यात आले. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा, जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार!” असे त्यांनी यामध्ये म्हटले होते. त्यामुळे या बॅनरवरून राज्याचे राजकारण आणखी तापले आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
One Comment on “जगात हिंदुहृदयसम्राट फक्त एकच! उद्धव ठाकरेंचा शिंदेवर निशाणा”