पुणे, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणताही पर्याय नाही, असे विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी केले आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याच्या विरोधकांच्या हेतूंबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी नरेंद्र मोदी हे महाआघाडीच्या विरोधात पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
https://twitter.com/ani_digital/status/1739281606169251880?s=19
“तुम्ही आत्ताच काही अंदाज बांधू नका. या गोष्टी अगदी शेवटच्या क्षणी घडतात आणि निवडणुकीत काय होईल? हे सांगणारा मी काही ज्योतिषी नाही. पण तुम्हाला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे असणार आहेत. महाआघाडीच्या आणि इंडिया आघाडीच्या विरोधात नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी कोणीही उमेदवार नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय कोणताही पर्याय नाही. बघा, मी अतिशय स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला असं वाटतं की, आजच्या काळात पंतप्रधान पदासाठी देशात मोदींशिवाय दुसरा कोणीही योग्य उमेदवार नाही. नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत,” असे ते पुढे म्हणाले. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या विरोधात सामोरे जाण्यासाठी आपली स्थिती मजबूत केली आहे.” असे अजित पवार यावेळी म्हणाले.