ठाणे, 23 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे.
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
ते ठाणे येथे बोलत होते. “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सध्या प्रयत्न करीत आहे. मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द दिला आहे. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना या अतिशय वेदनादायक आणि दुर्दैवी आहेत. मराठा समाजाच्या तरुणांना मी विनंती करतो की, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. आपला जीव लाख मोलाचा आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा आई-वडिलांचा तसेच मुला-बाळांचा विचार करा, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
“मी पण सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून, समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. याशिवाय, राज्य सरकारची मराठा आरक्षण संदर्भातील क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करुन घेतली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकार मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडेल”, असेही आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दमदार विजय
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 ऑक्टोंबर पर्यंत मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घ्यावा, नाहीतर येत्या 25 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
One Comment on “मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये- एकनाथ शिंदे”