बारामती, 7 ऑक्टोबरः बारामती तालुक्यात गुरुवारी, 6 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसाने बारामती तालुक्यातील पश्चिम भागाला अक्षरशः झोडपून काढले. बारामती तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ही सोमेश्वर नगर, तर त्या खालोखाल मुर्टी गावात झाली आहे. सोमेश्वर नगरला तब्बल 67.4 मिमी तर मुर्टी गावात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बारामतीत कलम 33 (1) लागू
तसेच जराडवाडी (48 मिमी), सोनगाव (43.6 मिमी), लोणी भापकर (41 मिमी), पळशी (41 मिमी), 8 फाटा होळ (39 मिमी), जळगांव सुपे (39 मिमी), वडगांव निंबाळकर (37 मिमी), लाटे (33 मिमी) तर काटेवाडी (32.7 मिमी) आणि बारामती शहर (30 मिमी) पावसाची नोंद करण्यात आली.
बारामती तालुक्यातील पश्चिम भागाला पावसाने झोडपल्याने शेतातील उभी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यात बाजरी, सोयाबीन, सूर्यफूलसह अन्य पिके तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.