बारामती, 29 सप्टेंबरः किमान वेतन कायद्याचे उल्लंघन संदर्भात कामगार अप्पर आयुक्त आणि बारामती कंत्राटी कामगार युनियन प्रतिनिधी यांच्यात 27 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या सकारात्मक शिष्टाई चर्चा झाली. या चर्चेनंतर बारामती नगर परिषदेच्या कंत्राटी कामगार युनियनचे आंदोलन तात्पुरते टळले आहे. दरम्यान, बारामती नगर परिषदेचे ठेकेदार नितीन डी कदम हॉस्पिटॅलिटी एलएलपी यांच्या अन्यायकारक धोरणाविरोधात बारामती कंत्राटी कामगार युनियनने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. कंत्राटी कामगारांच्या अन्याय संदर्भात कामगार अप्पर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले.
एमपीएससीच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
तसेच कामगार अप्पर आयुक्तांनी बारामती नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यासंबंधित बारामती कंत्राटी कामगार युनियनला विनंती केली आहे. यासह संबंधित ठेकेदार विरोधात एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला असून सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर या अधिकाऱ्यांची त्यावर नियुक्ती केली आहे. कामगार अप्पर आयुक्त आणि कामगार प्रतिनीधी यांच्या चर्चा दरम्यान निसान झाले आहे.
कामगार ओळखपत्र, किमान वेतन, ज्यादा केलेल्या कामाचा मोबदला हे कामागारांचे मूलभूत अधिकार असल्याचे कामगार अप्पर आयुक्तांनी चर्चा दरम्यान सांगितले. तसेच या संबंधीत कामगार आयोगाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर 2022 रोजी होणार असल्याचे निर्देश आणि आदेश कामगार अप्पर आयुक्तांनी संबंधितांना दिले आहे.