बारामतीत वाहतुक व्यवस्था कोलमडली!

बारामती, 5 ऑक्टोबरः बारामती शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडलेली दिसून येत आहे. बारामती शहरात जागो जागी, चौका चौकांमध्ये अस्थायी अतिक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यास अतोनात हाल होत आहे.

बारामती शहरातील कारभारी चौक, गुणवडी चौक, शिवाजी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक या चौकात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुक कोंडी होताना दिसत आहे. यासह नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासन या अतिक्रमणांवर कारवाया करताना दिसत नाहीत. यामुळे उपलब्ध रस्ताची रुंदी ही कमी झाली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

शारदानगरमध्ये दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

बारामतीचा विकास होत असताना वाहनतळांचे व खाजगी पार्किंग तळांची व्यवस्था नसल्याने शहरामध्ये वाहतुक कोंडी होत असल्याचे नगरपरिषदेचे अधिकारी बोलत आहेत. तर पोलीस प्रशासनात अपुरी कर्मचारी बळ असल्यामुळे वाहतुक व्यवस्थापन करायला पोलिसांची संख्या कमी पडत आहे, अशी उत्तरे मिळत आहेत.

भाजपाची वरात आरपीआयच्या दारात!

वाहतुकी शाखा ही कमाई शाखा असल्याने या शाखेत हित संबंधित, नाते संबंधित व टार्गेट पुर्ण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर लावले असल्यामुळे हे अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. बाजारपेठेत वाहतुक शाखा व्यापारांशी आर्थिक हितसंबंध असल्याने व्यापाऱ्यांच्या दारात लावल्या गाड्यांवर कारवाई का केली जात नाही? तसेच अतिक्रमण केलेले फळभाजी, पालेभाजी विक्रेते हे पथचाऱ्यांवर आरेरावी करून वाहतुकीस कोंडी निर्माण करत आहेत. त्यामुळे बारामतीत वाहतुकी व्यवस्था, व्यवस्थापन व नियोजन करणारी यंत्रणा अस्थित्वात आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

One Comment on “बारामतीत वाहतुक व्यवस्था कोलमडली!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *