बारामती, 4 जूनः (प्रतिनिधी- शरद भगत) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यात बारामती तालुक्यातील सुपे येथील इंग्रजी माध्यमिक विद्यालय, खंडूखैरेवाडी चा निकाल सलग 6 व्या वर्षी 100 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालासह विद्यालयाने यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. तसेच यंदाही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
उद्या लागणार इयत्ता 10 वीचा निकाल!
प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी-
1) आदित्य राजाराम खैरे- 89.8%.
2) ओम दत्तात्रय कुतवळ- 89%.
3) प्राजक्ता ढोले विजय- 85.5%
या वर्षी विद्यालयाचे एकूण 36 विद्यार्थी दहावी बोर्ड प्रमाणपत्र परिक्षेसाठी बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी चांगल्या मार्क्सने पास झाले असल्याची माहिती शाळेचे वरिष्ठ लिपिक वैभव जराड यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापिक मनिषा खैरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे. तसेच संस्थापक अध्यक्ष दिलीप खैरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. विद्यार्थ्यांना निकाल 14 जून 2023 रोजी हातात देणार असल्याची माहिती जराड यांनी दिली.
ग्रामपंचायत आणि पंचायत समितीविरोधात भाजपकडून उपोषणाचा इशारा
2 Comments on “इंग्रजी माध्यमिक विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम”