पुणे पुस्तक महोत्सवात साकारला तिसरा विश्वविक्रम!

पुणे, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवातील उपक्रमांतर्गत सलग तिसरा विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या महोत्सवाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://x.com/nbt_india/status/1736037941334651364?s=20

पुणे पुस्तक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरीयर्स’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या सुमारे 18 हजार 751 प्रतींनी ‘जयतू भारत’ हे वाक्य तयार करण्यात आले आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यापूर्वी हा विक्रम सौदी अरेबियाच्या नावावर होता. सौदी अरेबियाने हा विक्रम करताना त्यावेळी 11 हजार 111 पुस्तकांचा वापर केला होता.

याच्याआधी दोन विश्वविक्रम झाले होते!

पुणे शहरातील आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात यापूर्वी दोन विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आलेले आहेत. या महोत्सवात याच्याआधी बालक-पालक सामूहिक गोष्ट सांगण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात 3,066 पालकांनी सहभाग घेऊन आपल्या मुलांना सलग 4 मिनिटे गोष्ट वाचून दाखवली. या विश्वविक्रमाचे नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. यापूर्वी हा विक्रम चीनच्या नावावर होता. त्यावेळी 2,200 पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवली होती.

https://x.com/PMCPune/status/1735210087910920531?s=20

https://twitter.com/PandeRajeshBJP/status/1735629608295510249?s=19

तसेच पुणे पुस्तक महोत्सवात आणखी एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. यावेळी तब्बल 7,500 पुस्तकांनी ‘भारत’ हा शब्द साकारून विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली. हा विश्वविक्रम पुणे पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आला. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. तर यापूर्वी हा विक्रम सौदी अरेबियाच्या नावावर होता. त्यांनी 7,191 पुस्तकांच्या साहाय्याने हा विक्रम केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या महोत्सवाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *