मुंबई, 29 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 7 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात 2 लाख 76 हजार 300 कोटींची गुंतवणूक होणार असून 64 हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1751956215981056271?s=19
राज्यात 64 हजार रोजगार निर्मिती होणार
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात एनटीपीसी ग्रीन एनर्जी, अवादा ग्रीन हायड्रोजन, रिन्यु ई-फ्युअल्स, आयनॉक्स एअर प्रॉडक्टस्, एल.एन.टी. ग्रीन टेक, जे. एस. डब्ल्यू ग्रीन हायड्रोजन, वेलस्पन गोदावरी जीएच 2 या सात प्रस्तावित प्रकल्पांमुळे 2 लाख 76 हजार 300 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक होणार आहे. या 7 प्रकल्पांची क्षमता 910 किलो टन्स पर अनम इतकी आहे. त्यामुळे राज्यात 64 हजार रोजगार निर्मिती होऊन प्रति वर्ष 511 कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनात कपात होईल. यापासून सुमारे 4 हजार 732 केटीपीए हरित अमोनिया निर्मिती होणार आहे.
आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनी सोबत मोठा करार
यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनीसोबत 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात 6 एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प ही कंपनी उभारणार आहे. या करारामुळे राज्यात 20 हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, निप्पॉन स्टीलचे उपसंचालक कुबोटा सॅन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत हरलका उपस्थित होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1751949903067316231?s=19
पाहा, कोणत्या कंपनीसोबत करार झाले?
1) एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड.
एकूण गुंतवणूक ₹80,000 कोटी, रोजगार निर्मिती 12,000
2) जे. एस. डब्ल्यू एनर्जी लिमिटेड.
एकूण गुंतवणूक ₹15,000 कोटी, रोजगार निर्मिती 11,000
3) AVAADA ग्रीन हायड्रोजन प्रा. लिमिटेड आणि बाफना सोलर अँड इन्फ्रा. प्रा. लि.
एकूण गुंतवणूक ₹50,000 कोटी, रोजगार निर्मिती 8,900
4) रिन्यु ई-फ्युअल्स प्रा. लि.
एकूण गुंतवणूक ₹66,400 कोटी , रोजगार निर्मिती 27,000
5) वेलस्पन गोदावरी जीएच 2 प्रा. लि.
एकूण गुंतवणूक ₹29,900 कोटी, रोजगार निर्मिती 12,200
6) आयनॉक्स एअर प्रॉडक्टस् प्रा. लि.
एकूण गुंतवणूक ₹25,000 कोटी, रोजगार निर्मिती 300
7) एल.एन.टी ग्रीन एनर्जी टेक लिमिटेड.
एकूण गुंतवणूक ₹10,000 कोटी, रोजगार निर्मिती 1000