राज्याला मिळाल्या पहिल्या महिला मुख्य सचिव!

मुंबई, 01 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. सुजाता सौनिक यांनी सोमवारी (दि. 01 जुलै) मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्याचबरोबर सुजाता सौनिक यांना महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही मिळाला आहे. याप्रसंगी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान, सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. यावेळी नवनियुक्त सचिव सुजाता सौनिक यांनी आज पदभार स्वीकारला. याप्रसंगी, मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महानगर पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी देखील सुजाता सौनिक यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *