बारामतीच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली 20 वर्षांची शिक्षा

बारामती, 22 नोव्हेंबरः दौंड शहरातील 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बारामती येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून त्यास 20 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

गणेश कंपलीकर (रा. नटराज कॉलनीचे मागे, दर्गाजवळ, गोवागल्ली, दौंड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना मागील वर्षीच घडली होती. अवघ्या एका वर्षातच या खटल्याचा निकाल लागला आहे.

मिळालेल्या माहितीवरून, दौंड शहरातील 9 वर्षाची अल्पवयीन मुलगी ही चिंच खाण्याकरीता रेल्वे क्वार्टर, नटराज कॉलनी, दौंड येथे गेली. त्या ठिकाणी आरोपीने या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 4 एप्रिल 2021 रोजी घडली होती.

या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीवरून बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याची सुनावणी बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांच्या न्यायालयात सुरू होती. यामध्ये न्यायाधीश जे. ए. शेख यांनी आरोपीला दोषी ठरवून बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तब्बल 20 वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास दौंड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. लोंढे यांनी केला.

भारतीय युवा पँथरच्या धरणे आंदोलनाला यश

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासले. यात फिर्यादी म्हणजेच पीडितेची वडील यांनी न्यायालयात साक्ष दिली. सदर पीडिता ही 9 वर्षाची असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. तसेच या खटल्यात डॉ. आर. आर. पाखरे यांचा न्यायवैद्यक पुरावा महत्वाचा ठरला. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

सरकारी वकील सुनिल वसेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेश कंपलीकर याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी ठरवून 20 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम 10 प्रमाणे 5 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड व कलम 12 प्रमाणे 3 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

रासपकडून फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी

One Comment on “बारामतीच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली 20 वर्षांची शिक्षा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *