आज संध्याकाळ पर्यंत पाहता येणार सूर्यग्रहण

पुणे, 25 ऑक्टोबरः दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी एक विलक्षण खगोलीय घटना आज, मंगळवारी 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी सर्वांनाच पाहता येणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटांनंतर पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्यग्रहाणाचे विलोभनीय दृश्य आपल्या सर्वांना पाहता येणार आहे. 

गोविंदबागेत पाडवा भेट सोहळ्याचे आयोजन

बाजारात मिळणाऱ्या ‘सोलर इक्‍लिप्स गॉगल’ आणि दुर्बिणीच्या मदतीने नागरिक हे सूर्यग्रहण पाहू शकतात. मॉन्सून वेळेत परतल्याने आकाश आता निरभ्र असणार आहे. यामुळे सर्वांनाच आता सूर्यग्रहण स्पष्ट पाहता येणार आहे. चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार गडद सावली पृथ्वीवर पडते. यालाच आपण सूर्याला ग्रहण म्हणतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवरून प्रवास करते. पृथ्वीच्या ज्या भागांवरून ही सावली प्रवास करते, त्या भागांमध्ये खंडग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.

असे पाहा सूर्यग्रहण!
– बाजारात मिळणारे सोलर गॉगल्स वापरून
– घरी पिनहोल कॅमेरा बनवा
– सूर्याचे प्रतिबिंब थेट डोळ्यावर न पडणारी अशा कोणत्याही पद्धतीने
– सूर्यग्रहण संध्याकाळी असल्याने सूर्याचे तेज थोडे कमी असेल, तरीही आवश्यक ती काळजी घेऊन ग्रहण पाहावे

काळा कार्डशीट पेपर, फॉईल पेपर, ट्रेसिंग पेपर आणि फेविकॉल इतक्‍याच साधनांची ‘पिनहोल कॅमेरा’ बनविण्यासाठी आवश्‍यकता असते. काळ्या कार्डशीट पेपरच्या नळीच्या एका बाजूला फॉईल पेपर, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसिंग पेपर लावला जातो. फॉईल पेपरला पाडलेल्या छोट्याशा छिद्रातून सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूकडील ट्रेसिंग पेपरवर पडतो. ट्रेसिंग पेपरवर पडलेली सूर्याची प्रतिमा उलटी असते. याद्वारे सूर्यग्रहण पाहता येते.

पुण्यात पोलिसांचा लाठीचार्जचा व्हिडीओ आला समोर

आज मंगळवारी, 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी सुर्यग्रहण दिसण्यास सुरुवात होणार आहे. तसेच 5 वाजून 43 मिनिटांनी सर्वाधिक सूर्य व्यापला जाईल. त्यानंतर 6 वाजून 05 मिनिटांनी ग्रहण सुटेल.

One Comment on “आज संध्याकाळ पर्यंत पाहता येणार सूर्यग्रहण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *